‘दंगल’ची विदेशात दंगल

 Pali Hill
‘दंगल’ची विदेशात दंगल

मुंबई - ‘दंगल’ चित्रपट भारतात उद्या (शुक्रवार) प्रदर्शित होणार असला तरी त्याने विदेशात आजच दणदणीत व्यवसाय केला आहे. अमेरिका, कॅनडा, दुबई येथे ‘दंगल’ आजच प्रदर्शित झाला असून वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे या चित्रपटानं काही शोजमध्येच सुमारे 3 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘दंगल’ भारतामध्ये 4 हजार 300 स्क्रीन्समध्ये तर विदेशात 1 हजार स्क्रीन्समध्ये प्रदर्शित होत आहे. ख्रिसमसच्या सुट्टीचा कालावधी आमिरसाठी लाभदायक असून यापूर्वी या काळात प्रदर्शित झालेले त्याचे ‘तारे जमीं पर’, ‘गजनी’, ‘धूम 3’, ‘पीके; हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटाचा विक्रम आमिरच्याच ‘पीके’ चित्रपटाच्या नावावर जमा असून तो मोडण्याची ‘दंगल’ला संधी असल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत ऐकायला मिळत आहे.

Loading Comments