'दंगल'चा ट्रेलर आऊट

 Masjid Bandar
'दंगल'चा ट्रेलर आऊट

मुंबई - आमीर खानच्या 'दंगल' या सिनेमाचा ट्रेलर रीलिज झालाय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर रीलिज करण्यात आलं होतं. आमीरनं वाढवलेल्या वजनापासून, त्याच्या लूकपासून ते अगदी पोस्टरमध्ये दिसलेल्या अभिनेत्रीपर्यंत सगळ्याची चर्चा झाली होती.

चित्रपटात कुस्तीपटू आमीर खानच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री साक्षी तनवरने साकारली आहे. आमीर खाननं या सिनेमात गीता आणि बबिता यांच्या वडिलांची भूमिका साकारलीय. कुस्तीत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या मुलाचं स्वप्न पाहणारा बाप आमीरनं साकारलाय. पण आपल्याला मुलगा झाला नाही, म्हणून हताश न होता आपल्या मुलींमध्ये मुलाची छबी तो पाहतो आणि तिला कुस्तीपटू बनवण्यासाठी काय मेहनत घेतो आणि कोणकोणत्या परीक्षांना समोर जातो, हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. २३ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Loading Comments