मुंबई - प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांनी गुरुवारी गळफास घेत आयुष्य संपवलं. जगदीश यांना ४ वर्षांपासुन मधुमेहाचा त्रास होता. तसंच दोन वर्षांपूर्वी त्यांच्या गुडघ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एकटेपणा आणि आजारपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी व्यक्त केलाय. जगदीश हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांपासून वेगळे राहत होते.
कांदिवलीला राहणारे त्यांचे नातेवाईक त्यांचा सांभाळ करायचे. जगदीश आणि त्यांच्या पत्नी यांच्यात वाद सुरु होते. त्यातून यांनी एकमेकांवर केसेसही केल्या होत्या.