... म्हणून दिशा पटानी झाली ट्रोल

स्लो मोशन गाण्यात दिशा पिवळ्या साडीत फार मादक दिसतेय. पण साडीमुळे ती सध्या ट्रोल होतेय. या गाण्यामध्ये दिशाची साडी खूप बोल्ड होती आणि या बोल्ड साडीमध्ये पदराचे काहीही महत्त्व राहिले नव्हते.

SHARE

सलमान खानची फिल्म 'भारत'चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये सलमान आणि दिशाच्या जोडीची खूप चर्चा होत आहे. मात्र त्यापेक्षा जास्त चर्चा दिशाच्या साडीची होत आहे. गाण्यामध्ये दिशानं पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.  पण या साडीमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. 


साडी कुठे आहे?

स्लो मोशन गाण्यात दिशा पिवळ्या साडीत फार मादक दिसतेय. पण साडीमुळे ती सध्या ट्रोल होतेय. या गाण्यामध्ये दिशाची साडी खूप बोल्ड होती आणि या बोल्ड साडीमध्ये पदराचे काहीही महत्त्व राहिले नव्हते. हे पाहून सोशल मीडियावर अनेक जण विचारात आहे की, साडी कुठे आहे? अनेकांनी साडीसोबत केलेल्या या प्रयोगाचा विरोध केला. तर अनेकजण या लुकला एक्सपेरिमेंटल म्हणत आहेत. 


सलमानचे अनेक रोल

'भारत' सिनेमात सलमानचे अनेक रोल पाहायला मिळणार आहेत. यात सलमान १७ वर्षाच्या मुलापासून ते ७० वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सलमान आणि दिशाशिवाय या सिनेमात कतरिना कैफ, सुनील ग्रोवर, तब्बू आणि जॅकी श्रॉफची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यावर्षी ईदला म्हणजे ५ हा जूनला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

राणीनं पुन्हा चढवली खाकी

विकीचा उधमी लुक पाहिला का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या