Coronavirus cases in Maharashtra: 1460Mumbai: 876Pune: 181Kalyan-Dombivali: 32Navi Mumbai: 31Thane: 29Islampur Sangli: 26Ahmednagar: 25Pimpri Chinchwad: 19Nagpur: 19Aurangabad: 17Vasai-Virar: 11Buldhana: 11Akola: 9Latur: 8Other State Citizens: 8Satara: 6Panvel: 6Pune Gramin: 6Kolhapur: 5Malegaon: 5Yavatmal: 4Ratnagiri: 4Amaravati: 4Usmanabad: 4Mira Road-Bhaynder: 4Palghar: 3Jalgoan: 2Nashik: 2Ulhasnagar: 1Gondia: 1Washim: 1Hingoli: 1Jalna: 1Beed: 1Total Deaths: 97Total Discharged: 125BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

विकीचा उधमी लुक पाहिला का?


विकीचा उधमी लुक पाहिला का?
SHARE

नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अभिनेता विकी कौशलच्या करियरचा ग्राफ दिवसेंदिवस अधिकाधिक उंचावत आहे. एका मागोमाग एक दमदार भूमिका साकारत तो रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. 'सरदार उधम सिंह' यांच्यावरील चित्रपटातील विकीचा उधमी लुक लक्षवेधी लुक पाहिला का?


जालियानवाला बाग हत्याकांड

भारतीय इतिहासातील काळी घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एप्रिल महिन्यातील जालियानवाला बाग हत्याकांडाच्या दु:खद घटनेला यंदा १०० वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत दिग्दर्शक शुजीत सरकार सरदार उधम सिंह यांचा बायोपिक बनवत आहेत. या चित्रपटात विकीला ते उधम सिंह यांच्या भूमिकेत सादर करणार आहेत. या चित्रपटातील विकीचा उधम सिंहांच्या रूपातील लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. 


उधम सिंह यांची कथा 

शुजीत सरकार यांनी कायम विविधांगी विषयांना हात घातला आहे. आता ते उधम सिंह यांची कथा सांगण्यासाठी सज्ज झाले आहेत. उधम सिंह यांनी १९४० मध्ये लंडनमध्ये जाऊन मायकल डायरची हत्या केली होती. हा तोच पंजाबचा पूर्व लेफ्टनंट गव्हर्नर डायर होता, ज्याच्या सांगण्यावरून रौलेट अॅक्ट विरोधात जालियानवाला बागमध्ये सुरू असलेल्या सभेत अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता. ज्यात ४०० हून अधिक निरपराध लोक मारले गेले होते. 


विविध देशांमध्ये चित्रीकरण 

सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या विकीला उधम सिंह यांच्या भूमिकेत सादर करत सरकार यांनी केवळ तरूणाईलाच नव्हे, तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जगभरातील विविध देशांमध्ये करण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाचं पहिलं शेड्युल युरोपमध्ये सुरू आहे. युरोपमधील सेटवरूनच विकीचा उधमी लुक समोर आला आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


संघर्ष, त्यागाची कथा

भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये सरदार उधम सिंह या क्रांतीकारकांचं खूप मोठं योगदान असल्यानं त्यांच्यावर आधारित चित्रपट बनवत असल्याचं शुजीत सरकार यांचं म्हणणं आहे. आजच्या पिढीला उधम सिंह यांचा संघर्ष आणि त्यागाची कथा ठाऊक नाही. ते सांगणं गरजेचं आहे. या महान क्रांतीकारकावर चित्रपट बनवण्यासाठी पुन्हा एकदा लेखक रितेश शाह आणि शुभेंदु भट्टाचार्य तसंच निर्माते रॅानी लाहिरी यांच्यासोबत काम सुरू केल्याचं शुजीत म्हणतात.हेही वाचा-

आफताब शिवदासानी दिसणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत

रणवीरचा ‘८३’, तर शाहरुखचा क्लास आॅफ ‘८३’!
संबंधित विषय
संबंधित बातम्या