संगीत दाते यांचं निधन

 Pratiksha Nagar
संगीत दाते यांचं निधन
संगीत दाते यांचं निधन
See all

शीव - ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचा धाकटा मुलगा संगीत दाते यांचे निधन झाले. सायन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी संगीतसृष्टीला भावगीतांनी समृद्ध केलेल्या अरुण दातेंचा मुलगा संगीत काही दिवसांपूर्वी कफल्लक अवस्थेत आढळले होते. पुण्यातील वाकड पुलाखाली संगीत दाते भिकार्‍याचे जिणं जगत होते. भाऊ आणि वडिलांनी नातं तोडल्याचा दावा संगीत दातेंनी केला होता. संगीत दाते यांच्या निधनाबाबत कळवण्यासाठी नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु कोणीही उत्तर देत नसल्याने, संगीत यांची बालमैत्रीण, जॉय नागेश भोसले आणि मित्रमंडळींनी बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

Loading Comments