Advertisement

'टायगर जिंदा है'चं पहिलं पोस्टर रिलीज!


'टायगर जिंदा है'चं पहिलं पोस्टर रिलीज!
SHARES

दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी खास भेट घेऊन आला आहे. दिवाळीचं निमित्त साधत सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे. 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर भाईजाननं सोशल मीडियावर शेअर केलं आहे.



जखमी वाघासारखी शिकार कुणीच करू शकत नाही, अशी टॅगलाइन पोस्टरवर देण्यात आली आहे. हातात मशिनगन आणि भेदक नजर असा सलमानचा अंदाज पोस्टरवर पहायला मिळत आहे. 'दिवाळी भेट आवडली का? आता ख्रिसमसला या,' अशी कॅप्शनही सलमाननं दिली आहे.



अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्यामुळे चर्चेत आहे. 'टायगर जिंदा है' चित्रपटाच्या निमित्तानं ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टायगर जिंदा है चित्रपटाच्या पोस्टरला चाहत्यांकडूनही पसंती मिळाली आहे.







हेही वाचा

'तुम्हारी सुलु'चा ट्रेलर प्रदर्शित

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा