डेव्हिड गेटाचा बंगळुरूतील कार्यक्रम रद्द, आता मुंबईत होणार

 Pali Hill
डेव्हिड गेटाचा बंगळुरूतील कार्यक्रम रद्द, आता मुंबईत होणार

मुंबई - डिजे म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेव्हिड गेटा याचा बंगळुरूतील कार्यक्रम सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रद्द करण्यात आला आहे. आता मुंबईत होणारा त्याचा कार्यक्रम वेळेवर होणार आहे. बंगळुरूच्या अॅम्बेसी आंतरराष्ट्रीय रायडिंग स्कूलमध्ये हा कार्यक्रम होणार होता. मात्र कायदा सुव्यवस्थेचा हवाला देत पोलिसांनी कार्यक्रम दुसऱ्या कोणत्यातरी दिवशी ठेवण्यास सांगितले होते. पण मुंबई, दिल्ली आणि हैदराबादमध्ये होणारे कार्यक्रम वेळेनुसार होणार आहेत. गेटाने 2012 मध्ये भारतात पहिल्यांदा त्याचा कार्यक्रम केला होता.

Loading Comments