Advertisement

'शतदा प्रेम करावे' मध्ये सायलीच्या भूमिकेत 'ही' अभिनेत्री


'शतदा प्रेम करावे' मध्ये सायलीच्या भूमिकेत 'ही' अभिनेत्री
SHARES

स्टार प्रवाहच्या 'शतदा प्रेम करावे' या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे. अल्लड, अवखळ असलेल्या सायलीच्या भूमिकेतील ज्ञानदा ही प्रेक्षकांना आवडेल का पहावं लागेल.


तिची जागा ज्ञानदा घेणार

अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट 'शतदा प्रेम करावे' या मालिकेत उलगडली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभते आहे. त्या दोघांमध्ये हळवं नातं निर्माण होऊ लागलं आहे. मात्र, सायलीची भूमिका साकारणारी स्नेहा शहा काही कारणानं या मालिकेत काम करू शकणार नाही. तिची जागा आता
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे. यामालिकेतून ज्ञानदाचं स्टार प्रवाहवर पदार्पण होत आहे.


'शतदा प्रेम करावे'ची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. अभिजित साटम, अमिता खोपकर, प्रिया मरठेहे माझे आवडते कलाकार आहेत. त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला. सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत. त्यामुळे ही भूमिका करायलाही नक्की मजा येईल. या भूमिकेसाठी मी खूप एक्सायटेड आहे.
- ज्ञानदा रामतीर्थकर, अभिनेत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा