दोस्त दोस्त ना रहा?


  • दोस्त दोस्त ना रहा?
  • दोस्त दोस्त ना रहा?
SHARE

वांद्रे - निर्माता दिग्दर्शक करण जोहरचा 'लकीचार्म' त्याच्यापासून दूर गेलाय. अगदी कालपर्यंत जीवलग मैत्री असलेल्या अभिनेत्री काजोल आणि करण जोहर यांच्या नात्यात काही वैयक्तिक कारणांमुळे दुरावा आलाय. याचा प्रत्यय नुकत्याच डिझायनर मनिष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीत पहायला मिळाला. सोमवारी 5 डिसेंबरला मनिष मल्होत्राचा 50 वा वाढदीवस होता. त्यानित्तानं त्यानं रविवारी रात्री बर्थडे पार्टी ठेवली होती. त्यात काजोल आणि करण दोघेही आले होते. मात्र ते एकमेकांशी बोलले नाहीत. हा एरवी योगायोगही मानला गेला असता, पण करण-काजोलच्या मैत्रीत कुछ कुछही राहिलेलं नाही, हे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झालं.

दुसऱ्या दिवशी करणनं आयोजित केलेल्या पार्टीचं काजोलला निमंत्रणच नव्हतं. दोघांपैकी एकानंही अजूनतरी याच्यावर भाष्य केलेलं नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या