Advertisement

‘एकदा काय झाले’


‘एकदा काय झाले’
SHARES

माटुंगा - महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे आयोजित ‘एकदा काय झाले’ या नाटकाचा प्रयोग मुंबईच्या यशवंत नाट्यगृहात सादर करण्यात आला. ‘तिफली इन्टरनॅशनल फेस्टीवल ऑफ थेएटर फॉर चिल्ड्रन’ या फेस्टीव्हलमध्ये हा प्रयोग सादर करण्यात आला. या नाटकाचं लेखन विभावरी देशपांडे आणि दिग्दर्शन राधिका इंगऴे यांनी केलं. नाटक गोष्टीरूपातून प्रेक्षकांसमोर उलगडलं गेलं. सध्या लहान मुलांना वाढवताना होणाऱ्या पालकांच्या चुका आणि त्याचे मुलांवर होणारे परिणाम मजेशीर पद्धतीने दाखवण्यात आलं. त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनविषयावर नाटकातून लहान मुलांना समजेल अश्या साध्या आणि सोप्या भाषेतून प्रबोधन करण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा