Advertisement

'बिग बॉस १०'च्या पर्वात झळकलेले स्वामी ओम यांंचं निधन

‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून झळकलेले स्वामी ओम यांचं निधन झालं आहे.

'बिग बॉस १०'च्या पर्वात झळकलेले स्वामी ओम यांंचं निधन
SHARES

‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वात स्पर्धक म्हणून झळकलेले स्वामी ओम यांचं निधन झालं आहे. ३ फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते.

गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. स्वामी ओम यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्य संस्कार केले जातील.

३ महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. १५ दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी आपल्या निवासस्थानी डीएलएफ अंकुर विहार इथं अखेरचा श्वास घेतला.

स्वामी ओम यांचे मित्र मुकेश जैन यांचा मुलगा अर्जुन जैननं सांगितल्यानुसार, कोरोनामधून बरे झाल्यानंतर स्वामी ओम यांना चालण्यास खूप त्रास व्हायचा. यानंतर त्यांच्या अर्ध्या शरीरावर अर्धांगवायू झाला. ज्यामुळे गेल्या १५ दिवसांत त्याची प्रकृती अधिकच खराब झाली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.



हेही वाचा

'KGF Chapter 2' चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी

हॉलिवूड पॉप स्टारकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, कंगना बोलली, "शांत बस मूर्ख"

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा