Advertisement

शनायाचे चाहते बनले डोकेदुखी!

रसिकाला बघण्यासाठी तिचे चाहते सेटवर बांधण्यात आलेली उंच सुरक्षा भिंतदेखील ओलांडून येत होते. सेटवरील कडक बंदोबस्तामुळे रसिकापर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही तर, मोबाईलवरून तिचा गुपचूप फोटो किंवा व्हिडियो काढण्याचा प्रयत्न चाहते करत होते.

शनायाचे चाहते बनले डोकेदुखी!
SHARES

व्यक्तीरेखा निगेटिव्ह वा पॅाझिटीव्ह... ती एकदा प्रेक्षकांना भावली की, तो कलाकार हिट व्हायला वेळ लागत नाही हे आजवर सर्वांनीच पाहिलं आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया बनून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या याचाच अनुभव घेते आहे. जिथे रसिका आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा आनंद उपभोगत आहे, तिथे शनायाला भेटण्यासाठी आतुर झालेले चाहते प्रॅाडक्शन हाऊससाठी डोकेदुखी ठरत आहेत.


शनायाची झलक पाहण्यासाठी

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया या कॅरेक्टरमुळे अभिनेत्री रसिका सुनील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तिचा चाहतावर्गदेखील खूप मोठा आहे. निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित ‘गॅटमॅट’ या आगामी मराठी चित्रपटाच्या सेटवर रसिकाच्या चाहत्यांनी संपूर्ण युनिटला हैराण करून सोडलं होतं. शनायाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे प्रॅाडक्शन हाऊसची चिंता वाढली होती.

 

प्रॅाडक्शन हाऊस हैरान

रसिकाला बघण्यासाठी तिचे चाहते सेटवर बांधण्यात आलेली उंच सुरक्षा भिंतदेखील ओलांडून येत होते. सेटवरील कडक बंदोबस्तामुळे रसिकापर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही तर, मोबाईलवरून तिचा गुपचूप फोटो किंवा व्हिडियो काढण्याचा प्रयत्न चाहते करत होते. अशाप्रकारे, ऐन चित्रीकरणादरम्यान होत असलेल्या चाहत्यांच्या घुसखोरीमुळे सेटवरील कामं बऱ्याचदा खोळंबलीदेखील होती. प्रॅाडक्शन हाऊससाठी जरी ही डोकेदुखी ठरली असली, तरी रसिकासाठी मात्र तो स्टारडमचा अनुभवच होता.


रसिका मुख्य भूमिकेत

अवधूत गुप्ते प्रस्तुत व यशराज इंडस्ट्रीज निर्मित ‘गॅटमॅट’ या चित्रपटात रसिका मुख्य भूमिकेत असून, तिच्या जोडीला अक्षय टंकसाळे, निखील वैरागर, पूर्णिमा डे आदी कलाकार आहेत. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव या चित्रपटाचे निर्माता आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा - 

‘फिल्मशाला २०१८’चा निकाल जाहीर

हिंदी ‘बिग बॅास’च्या घरावर मेघाची ‘धाड’
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा