Advertisement

‘फिल्मशाला २०१८’चा निकाल जाहीर

लॅन्डमार्क फिल्म्सने आयोजित केलेल्या 'फिल्मशाला' या आंतरशालेय राज्यस्तरीय चित्रपट समीक्षण स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस लाभला. राज्यभरातून तब्बल १२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ज्यात काही वंचित आणि गरजू प्रवर्गातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

‘फिल्मशाला २०१८’चा निकाल जाहीर
SHARES

लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शीत ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘फिल्मशाला २०१८’ या अनोख्या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. 


चित्रपट समीक्षण स्पर्धा

लॅन्डमार्क फिल्म्सने आयोजित केलेल्या 'फिल्मशाला' या आंतरशालेय राज्यस्तरीय चित्रपट समीक्षण स्पर्धेला स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. राज्यभरातून तब्बल १२ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ज्यात काही वंचित आणि गरजू प्रवर्गातील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. अंतिम निकाल यादीत माध्यमिक शाळेतील ‘राईट व्ह्यू’ स्पर्धेमध्ये मराठी विभागातून तृष्णा नाईक (चोगले हायस्कूल), इंग्रजी विभागातून इशिका तुलसियन (आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी) आणि हिंदी विभागातून कांचन यादव (दिक्षित रोड म्युनिसिपल स्कूल) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्राथमिक शाळेतील ‘टायनी ट्वीट’ स्पर्धेमध्ये उदयाचल प्रायमरी स्कूलच्या स्वयम हांडेने प्रथम पारितोषिक पटकावलं.


पिप्सी’ कसा वाटला? 

मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या राज्यपुरस्कार विजेत्या बालकलाकारांच्या समृद्ध अभिनयाने नटलेला ‘पिप्सी’ हा चित्रपट ‘फिल्मशाला’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेतील  विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. ज्यात ‘पिप्सी’बद्दलचं विद्यार्थ्यांचं मत आणि समीक्षण विचारात घेतलं गेलं. त्यासाठी, शाळेतील प्राथमिक विभागासाठी ‘टायनी ट्वीट’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे २०० अक्षरांमध्ये व माध्यमिक विभागासाठी ‘राईट व्ह्यू’ या उपक्रमाद्वारे ५०० शब्दांमध्ये ‘पिप्सी’ कसा वाटला या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी अभिनेते सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता आणि सी.एफ.एस.आय. समितीचे माजी सदस्य आणि लेखक कमलाकर नाडकर्णी या दिग्गजांनी परीक्षकांची भूमिका बजावली. 


विचार गहनतेबाबत आश्चर्य

राज्यभरात यशस्वीपणे पार पडलेल्या या स्पर्धेविषयी बोलताना पिप्सी सिनेमाच्या प्रस्तुतकर्त्या आणि निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या की, आपल्या सभोवताली अनेक हुशार मुलं असतात. त्यांच्यातील या गुणवत्तेला वाव देण्यासाठी ‘पिप्सी’सारख्या वैचारिक आणि मनोरंजक सिनेमाचा उपयोग करून घ्यावा असं वाटलं. प्रत्येक स्क्रीनिंगनंतर आम्ही सिनेमाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा, त्यांच्यातील परिपक्वता आणि विचार गहनतेबाबत आश्चर्य वाटलं. 


दरवर्षी उपक्रम 

‘फिल्मशाला’सारख्या उपक्रमांमुळे भविष्यातील प्रेक्षकांची विचारसरणी वृद्धिंगत होण्यास मदत होईल. जेणेकरून भावी काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचा आशय आणि दर्जा सुधारण्यासाठी आपण प्रेरित होऊ शकू. तूर्तास हेच लक्ष्य अंगी बाणलं असून, दरवर्षी हा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याचंही कासलीवाल म्हणाल्या.


स्पर्धेचा निकाल खालीप्रमाणे...

राईट व्ह्यू (मराठी)

प्रथम पुरस्कारः तृष्णा नाईक - चोगले हायस्कूल

द्वितीय पुरस्कार: सानिका मानकर – उदयाचल हायस्कूल

तृतीय पुरस्कारः सई बचुटे -  उदयाचल हायस्कूल

चौथा पुरस्कारः जान्हवी बापट - चोगले  हायस्कूल

पाचवा पुरस्कारः अरमान कांबळे - समता विद्यामंदिर


राईट व्ह्यू (इंग्रजी)

प्रथम पुरस्कारः इशिका तुलसीयन - आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी

द्वितीय पुरस्कारः अमेय दोशी – पोदार ओ.आर.टी. इंटरनॅशनल स्कूल

तृतीय पुरस्कारः अद्विका श्रीनिवासन – उदयाचल हायस्कूल

चौथा पुरस्कार: आर्य मेनन - एवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूल

पाचवा पुरस्कारः भव्य कृष्णन - एवलॉन हाइट्स इंटरनॅशनल स्कूल 


राईट व्ह्यू  (हिंदी)

प्रथम पुरस्कारः कांचन यादव - दीक्षित रोड म्युनिसिपल स्कूल

द्वितीय पुरस्कार: प्रीती गुप्ता - दीक्षित रोड म्युनिसिपल स्कूल


राईट व्ह्यू  (विशेष जूरी पुरस्कार)

प्रथम पुरस्कारः झोइ ओबेरॉय - आदित्य बिर्ला इंटीग्रेटेड स्कूल

द्वितीय पुरस्कारः श्रुती वालावे - नित्यानंद बीएमसी स्कूल


टायनी ट्वीट

प्रथम पुरस्कारः स्वयम हांडे - उदयाचल प्राथमिक शाळा

द्वितीय पुरस्कार: आरोही बांदोडकर - उदयाचल प्राथमिक शाळा

तृतीय पुरस्कारः अदिती पराडकर - उदयाचल प्राथमिक शाळा


फिल्मशाला  २०१८ विजेता

गउदयाचल स्कूल



हेही वाचा - 

“कुणीतरी येणार येणार गं…”

हिंदी ‘बिग बॅास’च्या घरावर मेघाची ‘धाड’

राखी सावंतविरोधात तनुश्रीचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा