Advertisement

विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक, समोर आली महत्त्वाची माहिती

बुधवारी संध्याकाळपासूनच विक्रम गोखलेंच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्या आहेत.

विक्रम गोखलेंची प्रकृती चिंताजनक, समोर आली महत्त्वाची माहिती
SHARES

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयीचे महत्त्वाचे अपडेट्स मेडिकल बुलेटिनद्वारे देण्यात आले आहेत.

गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद त्यांचं शरीर देत नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत, तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाही, असं गोखले यांचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले म्हणाले.

विक्रम गोखले यांना 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारपासून त्यांची तब्येत खालावली. “बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. पुढे काय करायचं हे डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी दिली होती.

बुधवारी संध्याकाळपासूनच त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी कोणत्याच अफवा पसरवू नका आणि त्यावर विश्वास ठेवू नका, अशी विनंती राजेश दामले यांनी केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा