Advertisement

मुक्ता बर्वे आणि 'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२ व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८' हा स्मिता पाटील यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व ४० वर्ष पूर्ण केलेल्या 'जैत रे जैत' या चित्रपटाला जाहीर झाला आहे.

मुक्ता बर्वे आणि 'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार
SHARES

मराठी भाषेचा 'उंबरठा' ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२ व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा 'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८' हा स्मिता पाटील यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व ४० वर्ष पूर्ण केलेल्या 'जैत रे जैत' या चित्रपटाला जाहीर झाला आहे. त्यासोबतच 'स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१८' अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


१५ डिसेंबरला सोहळा

विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शनिवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी रात्री ८:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात 'जैत रे जैत' चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाच्या निर्मात्या उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या 'जैत रे जैत' आणि 'उंबरठा' चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे.


अस्मिता कार्यक्रम 

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार अाहे.  पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्मिताच्या स्मृतीखातर जीवनगाणीने खास निर्माण केलेला मूर्तीमंत 'अस्मिता' हा कार्यक्रम सादर केला जाईल. अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या 'जैत रे जैत' आणि 'उंबरठा' या दोन चित्रपटांतील गाणी सादर करतील. आनंद सहस्रबुद्धे याचं संगीत संयोजन  करणार आहेत.

'स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गतवर्षी हा पुरस्कार अभिनेत्री रेखा यांना आणि 'स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार २०१७' अभिनेत्री अमृता सुभाष हिला देण्यात आला होता.हेही वाचा - 

व्हॅनिटी व्हॅनचे कर्मचारी संपावर, चित्रीकरणात अडचणी

दुबईत 'जल्लोष' करणार अवधूत-श्रेयस
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा