Advertisement

व्हॅनिटी व्हॅनचे कर्मचारी संपावर, चित्रीकरणात अडचणी

महाराष्ट्रात व्हॅनिटी व्हॅनवर ५ हजार रुपये प्रति चौरस मीटर या दराने कर भरावा लागतो. त्यामुळं त्याचा वार्षिक बोजा १ लाख २५ हजार रुपये येत असल्यामुळं व्हॅन मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

व्हॅनिटी व्हॅनचे कर्मचारी संपावर, चित्रीकरणात अडचणी
SHARES

बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांना चित्रिकरणावेळी 'व्हॅनिटी व्हॅन'ची सेवा पुरवणाऱ्या 'ऑल कॅम्पर व्हॅन ओनर्स असोसिएशन'च्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी १० डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र सरकारानं व्हॅनिटी व्हॅनवर लावलेल्या करातून सवलत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. कर कमी होत नाही तोपर्यंत सेवा न पुरवण्याचा इशारा 'ऑल कॅम्पर व्हॅन ओनर्स असोसिएशन' दिला आहे. या संपाचा मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणावर परिणाम झाला आहे. 


कलाकारांचा पाठिंबा नाही

महाराष्ट्रात व्हॅनिटी व्हॅनवर ५ हजार रुपये प्रति चौरस मीटर या दराने कर भरावा लागतो. त्यामुळं त्याचा वार्षिक बोजा १ लाख २५ हजार रुपये येत असल्यामुळं व्हॅन मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा कर कमी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत 'ऑल कॅम्पर व्हॅन ओनर्स असोसिएशन'नं आझाद मैदान पोलिसांना निवेदन सादर केलं. मात्र, कलाकारांनी व्हॅनिटी व्हॅनच्या मालकांना पाठिंबा दिलेला नाही, असं 'ऑल कॅम्पर व्हॅन ओनर्स असोसिएशन'तर्फे सांगण्यात येत आहे.


राज्यात संप

कुठल्याही मालिका किंवा चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी कलाकारांच्या सोयीसाठी व्हॅनिटी व्हॅन असणे गरजेचे असते. परंतु त्यांनीच संप पुकारल्यामुळे चित्रीकरणावर याचे परिणाम दिसत आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू झाल्यामुळे अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात अडचणी येत आहेत.हेही वाचा-

दुबईत 'जल्लोष' करणार अवधूत-श्रेयस

'माऊली'ची जेजुरी-पंढरी वारी
संबंधित विषय
Advertisement