डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाचे स्पेशल शो


SHARE

दादर - चैत्यभूमीवर येणाऱ्या हजारों अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रपटाचे दोन शो आयोजित केलेत. पाच डिसेंबरला दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता शिवाजीपार्क इथं या शोचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहयोगानं चित्रपट विकास महामंडळामार्फत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आलीय.

डॉ. जब्बार पटेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठी संशोधन कार्य डॉ. य. दि. फडके यांनी केलंय. सूनी तारापोरवाला, अरुण साधु, दया पवार यांनी लेखन केलंय. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी यांच्यासह मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी, जीवन मेरी, राहूल सोलापूरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या