Advertisement

१६ दिवसांनी फिल्म, टीव्ही कामगारांचा संप मागे


१६ दिवसांनी फिल्म, टीव्ही कामगारांचा संप मागे
SHARES

मागील १६ दिवसांपासून सुरू असलेला फिल्म आणि टीव्ही कामगारांच्या २२ संघटनांचा संप बुधवारी कामगारमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला.

'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'ने १४ ऑगस्टपासून हा संप पुकारला होता. या संपात २.५० लाख फिल्म आणि टीव्ही कामगार सहभागी झाले होते. या संपाचा सिनेमा आणि टीव्ही चित्रीकरणावरही पडला.


काय होत्या मागण्या?

आठ तासांची शिफ्ट व्हावी, प्रत्येक अतिरिक्त तासाला दुप्पट वेतन मिळावे, सर्व विभागातील, श्रेणीतील कामगारांच्या (मासिक, दैनंदिन स्वरूपातील) वेतनात वाढ व्हावी, करारनाम्याशिवाय कामावर बंदी, कमीत कमी दरावरील करारनामा ग्राह्य धरण्यात येऊ नये, नोकरीची हमी, जेवणाची उत्तम व्यवस्था, सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली होती.

फिल्म आणि टीव्ही कामगारांच्या मागण्यांवर राज्य सरकार गंभीर आहे. कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी लवकरच एक नियमावली बनविण्यात येईल, असे आश्वासन सरकारने दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.



हे देखील वाचा - 

चित्रपट, टीव्ही इंडस्ट्रीतील कामगारांचं बेमुदत उपोषण; शूटिंगवर परिणाम



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा