चला हवा येऊ च्या सेटवर जॉन-सोनाक्षी

  मुंबई  -  

  मुंबई- बॉलिवूडमधील दमदार अॅक्शन हिरो अशी ओळख असलेला जॉन अब्राहम हा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोच्या प्रेमातच पडलाय. कारण जॉन त्याच्या प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी या कार्यक्रमात हजेरी लावतोय. तसं थुकरटवाडीची मंडळीही जॉनचं आदरातिथ्य करण्यासाठी कायमच सज्ज असतात. आताही जॉन आपल्या आगामी फोर्स 2 या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी या मंचावर येऊन गेला. या वेळी त्याच्या सोबतीला होती या सिनेमाची नायिका आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यासह चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनय देव ही या मंचावर उपस्थित होते. सगळ्यांनीच थुकरटवाडीत भरपूर धमाल मस्ती केली.

  जॉन आणि सोनाक्षीचा एक वेगळा अंदाजही या एपिसोडमध्ये पाहायला मिळाला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.