कपिल शर्माच्या अडचणी वाढल्या

 Andheri
कपिल शर्माच्या अडचणी वाढल्या
कपिल शर्माच्या अडचणी वाढल्या
कपिल शर्माच्या अडचणी वाढल्या
See all

वर्सोवा - सोमवारी वन खात्याच्या अधिका-यांनी कपिल शर्माच्या घराच्या मागील भागाच्या केलेल्या पाहणीत कपिलने मैंग्रोजच्या क्षेत्रावर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मनपा अधिका-यांवर लाचखोरीचे आरोप करणा-या कपिल शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत. 

याबाबत सहायक वनसंरक्षक मकरंद बी. घोडके यांनी सांगितले की, 'कपिल शर्माने आपल्या बंगल्याच्या मागील आवारातील मैंग्रोज क्षेत्रातील जवळपास दहा मीटर क्षेत्रावर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. या संबंधीची तक्रार मिळाल्यावर आम्ही येथे आलो होतो. आम्ही पूर्ण क्षेत्राचे निरिक्षण केले असून, आम्ही आपला अहवाल महसूल विभागाकडे करणार आहोत'. 

 कपिल शर्माने शुक्रवारी बंगला बनवताना मनपा अधिका-याकडून पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचे ट्विट करून वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर  आरटीआय कार्यकर्ते तसेच भाजपा, शिवसेना आणि मनसेने सदर अधिका-याचं नाव जाहीर करण्याची मागणी केली होती. 

Loading Comments