Advertisement

मैत्रीचं नातं सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं गाणं


मैत्रीचं नातं सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं गाणं
SHARES

मराठमोळा गायक रोहित राऊत आणि युथ सेन्सेशन जुईली जोगळेकर ही जोडी ‘तोळा तोळा-दिल दिया गल्ला…’ या पहिल्या मॅशअपनंतर नवं कव्हर साँग घेऊन अाली आहे. इकोनेक्टवरून रोहित-जुईलीचं ‘तेरा यार हूँ मै - तेरी यारियाँ…’  हे फ्रेंडशिप कव्हर साँग आलं आहे.

यंदाचा फ्रेंडशीप डे खास 

या गाण्याविषयी रोहित म्हणाला की, लोकाग्रहास्तव आम्ही पहिलं मॅशअप केलं. ते चाहत्यांना एवढं आवडलं, की त्यांनी अजून एक गाणं गाण्याचा आग्रह धरला. म्हणून आता हे दुसरं कव्हर साँग घेऊन आलो आहोत. चाहत्यांना वचन दिल्याप्रमाणे, अजून काही कव्हर साँग घेऊन येण्याचा आमचा मानस आहे. जुईली म्हणाली की, माझ्यासाठी आणि रोहितसाठी यंदाचा फ्रेंडशीप डे खास आहे. कारण आमच्या मैत्रीला यंदा एक दशक पूर्ण होत आहे. त्यामुळे दुसरं कव्हर साँग करताना मैत्री विषयाचीच दोन गाणी आम्ही निवडली.


प्रज्ञेश कदम यांचं दिग्दर्शन

प्रज्ञेश कदम यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं असून निर्मिती अतुल वाघ यांची आहे. छायालेखन प्रथमेश रांगोळे यांनी केलं असून, संकलन रोहिता मोरेचं आहे. रोहित आणि प्रज्ञेश यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या गाण्यात आदिनाथ पुतकर, वैभव कुलकर्णी आणि श्रुती थोरात यांनीही काम केलं आहे.



हेही वाचा -

'राकेश ओमप्रकाश मेहरांचीच तशी इच्छा होती!'

‘हृदयात समथिंग समथिंग’चा फर्स्ट लूक लाँच




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा