Advertisement

‘हृदयात समथिंग समथिंग’चा फर्स्ट लूक लाँच


‘हृदयात समथिंग समथिंग’चा फर्स्ट लूक लाँच
SHARES

प्रेमात पडल्यावर सतत त्या व्यक्तिला भेटण्याची हूरहूर मनाला लागते. आपल्याला ज्या व्यक्तिबद्दल खास ‘फिलींग्स’ असतात, ती व्यक्ती फक्त आपलीच व्हावी यासाठी प्रेमवीर नानाविध गोष्टी करत असतात. त्या प्रेमातल्या ‘केमिकल लोच्या’मुळे मग बऱ्याच गंमतीजमतीही घडतात. यावरच आधारित असलेला दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांचा ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


कुणाची निर्मिती?

पिरॅमीड फिल्म हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाची निर्मिती विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण आणि अतुल गुगळे यांनी केली आहे. तर सचिन नथुराम संत यांची सहनिर्मिती आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.


नवा विषय

दिग्दर्शक प्रविण कारळे सिनेमाविषयी म्हणाले की, हा धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपट आहे. अनिल कालेलकर यांनी लिहिलेल्या संवादामुळे तुम्ही चित्रपटभर सतत हसत राहाल. बऱ्याच कालावधीत मराठी फिल्म इंडस्ट्रीत असा विषय सिनेरसिकांच्या समोर आला नाही. चित्रपट प्रेमाविषयी असला तरीही कुटुंबातल्या ९० वर्षांच्या आजीपासून ते ९ वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे.


धमाल अनुभवा

निर्माते विनोदकुमार जैन यांच्या म्हणण्यानुसार, प्रेमात पडल्यावर प्रत्येकाच्याच ‘हृदयात समथिंग समथिंग’ होतं. आयुष्यात एकदा तरी या फिलींगची अनुभूती प्रत्येकानेच घेतलेली असते. तुम्ही प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीला इम्प्रेस करता-करता काही विनोदी घटना तुमच्या आयुष्यात घडल्या, तर काय धमाल येते यावर हा चित्रपट आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ ला रिलीज होणार आहे.



हेही वाचा-

झोप उडवणार गिरीश जोशींचा ‘टेक केअर गुड नाइट’

लहानग्यांचं विश्व आणि मनातील भावाची गोष्ट!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा