• ‘बिग बॅास’मध्ये मेघा, सई आणि पुष्करची पुन्हा जमणार गट्टी!
  • ‘बिग बॅास’मध्ये मेघा, सई आणि पुष्करची पुन्हा जमणार गट्टी!
SHARE

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला नाती बदलत असतात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे घरामध्ये उरलेली मोजकी मंडळी. मित्र-मैत्रिणींशिवाय फार काळ हे सदस्य राहू शकत नाहीत. कितीही भांडणं, गैरसमज झाले तरीही ते मिटवून पुढं जाणं अनिवार्य असतं. मेघा, सई आणि पुष्कर यांच्यामधील वाद विकोपाला गेले, त्यांच्यामध्ये बरीच भांडणं झाली, मतभेद झाले, आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे मेघाबरोबर असलेली पुष्कर-सईची मैत्री तुटते की काय, असं वाटत असतानाच आज या तिघांमध्ये पुन्हा मैत्री होताना बघायला मिळणार आहे.


उरले फक्त सात

या तिघांची मैत्री प्रेक्षकांच्याही पसंतीस पडत होती. आज हे तिघे पुन्हा एकत्र येणार आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये कालपर्यंत फक्त आठ सदस्य उरले होते. शेवटचे काही आठवडे उरल्यामुळे आता हा गेम अधिकाधिक कठीण होत जाणार आहे. या आठ सदस्यांमधून एक सदस्य काल घराबाहेर गेला. आता बिग बॉसच्या घरामध्ये फक्त सात सदस्य उरले आहेत.


नंदकिशोर चौघुले 'अाऊट'

बिग बॉसच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. दर आठवड्याप्रमाणे काल बिग बॉसच्या घरामधून नंदकिशोर चौघुले यांना घराबाहेर जावं लागलं. तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल? कोणते टास्क सदस्यांना मिळतील? कोण सुरक्षित होईल? हे पाहायला मिळेल.


पैसा फेक तमाशा देख

बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची धनराशी तब्बल २५ लाख रुपये असेल. आता सदस्यांना त्या धनराशीतला हिस्सा स्वत:साठी मागायचा आहे. तेव्हा पुढे काय होणार, हे बघणं रंजक ठरणार आहे. यासोबतच बिग बॉसमध्ये पैसा फेक तमाशा देख’ हे नॉमिनेशनचं कार्य रंगणार अाहे. या कार्यानिमित्त घरामध्ये बैलगाडी ठेवण्यात येणार आहे. ही बैलगाडी सर्व सदस्यांना १४व्या आठवड्याकडे नेणारी आहे. आता सदस्यांचं काय धोरण असेल? कोण नॉमिनेट होईल, हे पाहायचं आहे.


हेही वाचा -

बिग बाॅस : मेघा - पुष्करमध्ये होणार वाद

‘बिग बॅास’मध्ये शर्मिष्ठा, मेघा झाल्या भावूक!संबंधित विषय
ताज्या बातम्या