Advertisement

बिग बाॅस : मेघा - पुष्करमध्ये होणार वाद


बिग बाॅस : मेघा - पुष्करमध्ये होणार वाद
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना बिग बॉस नेहमीच एकापेक्षा एक सरप्राईझ देत असतात. असंच एक सरप्राईझ मंगळवारी सदस्यांना मिळालं. बिग बॉसमध्ये ‘घाडगे & सून’ या मालिकेतील माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक गेल्या. सुकन्या आणि अतिशा यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद झाला.


घरोघरी मातीच्या चुली

बिग बॉस यांनी सदस्यांना मंगळवारी एक टास्क दिला. संसार म्हटलं की, भांड्याला भांडे हे लागणारच. अगदी याप्रमाणेच सासू – सुनांच्या नात्यामध्येही खटके उडणं स्वाभाविक आहे. बिग बॉसमध्ये  “घरोघरी मातीच्या चुली” हे कार्य रंगले. ज्यामध्ये पुष्कर, सई, मेघा, आस्ताद, नंदकिशोर आणि शर्मिष्ठा यांना हिरे देण्यात आले. कारण, त्यांनी हे कार्य उत्तमरीत्या पार पाडलं. बुधवारी देखील घरामध्ये हे कार्य रंगणार आहे. परंतू बिग बॉसमध्ये वसुधाबरोबर असणार आहे घाडगे & सून मालिकेतील सगळ्यांची लाडकी अमृता.


टीममध्ये अदलाबदल 

बुधवारीही सासू सासऱ्यांना त्यांच्या जावई सुनांना सतवायचं आहे. मात्र, टीममध्ये अदलाबदल करण्यात येणार आहे. टीम सून - जावयाचं नेतृत्व भाग्यश्री तर टीम सासू – सासऱ्यांचं नेतृत्व अतिशा नाईक करणार आहेत. ज्यामध्ये शर्मिष्ठा आणि सईमध्ये तर मेघा आणि पुष्करमध्ये बरेच वाद होणार आहेत. रेशम स्मिताला हिरवी गोळी बनवायला सांगणार आहे. ज्यासाठी स्मिताला पाटा वरवंटा याचा वापर करायचा आहे.



हेही वाचा -

धक्कादायक! अभिनेत्री सोनाली बेंद्रेची कॅन्सर झुंज

‘राधा प्रेम रंगी रंगली’ची डबल सेंच्युरी!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा