Advertisement

‘राधा प्रेम रंगी रंगली’ची डबल सेंच्युरी!


‘राधा प्रेम रंगी रंगली’ची डबल सेंच्युरी!
SHARES

पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेनं नुकताच दोनशे भागांचा टप्पा गाठत डबल सेंच्युरी ठोकली आहे. मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, कथानक, कलाकार तसंच आपल्या कुटुंबावर नि:स्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधानं सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील, कविता लाड, गौतम जोगळेकर या सगळ्यांनाच प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे.


राधाकडे ‘गुड न्यूज’

सध्या ही मालिका एका उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. राधा प्रेमा म्हणून आनंद नाडकर्णी यांच्या इस्पितळात काम करत आहे. तसंच राधा गरोदर असल्याचं सत्य फक्त माधव निंबाळकर यांना ठाऊक आहे, जे राधानंच सांगितलं आहे. विश्वनाथ यांनी प्रेमला देवयानीच्या कारस्थानाबद्दल सांगितलं आहे. त्यामुळे पुढे काय घडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

२०० भाग पूर्ण

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच या मालिकेनं २०० भाग पूर्ण केले आहेत. सर्व कलाकारांनी २०० एपिसोड पूर्ण झाल्याचा आनंद सेटवर केक कापून साजरा केला. यावेळी सर्वांनी एकत्र भोजनही केलं. यानंतर मालिकेमध्ये येत्या काही भागांमध्ये बरेच ट्विस्ट येणार आहेत.


Exclusive: अभिनेत्री मृण्मयीचं दिग्दर्शनात पदार्पण!

Exclusive: 'एक' चेटकीण करतेय अाबालवृद्धांवर जादू!संबंधित विषय
Advertisement