Advertisement

'व्हायरस मराठी'मध्ये गौरी नलावडे आणि रिचा अग्निहोत्री


'व्हायरस मराठी'मध्ये गौरी नलावडे आणि रिचा अग्निहोत्री
SHARES

मुंबई - हल्ली सगळेच जण टेक्नोसॅव्ही झाले आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल साइट्सवर हल्ली सर्वच जण अॅक्टिव्ह असतात. याच गोष्टी लक्षात घेऊन मराठी नववर्ष दिनापासून 'व्हायरस मराठी' हे यू ट्युब चॅनल सुरू होतंय. 'ऑसम टू सम' या ट्रॅव्हल वेब सिरीजचा पहिला एपिसोड २८ मार्चला दुपारी ४ वाजता अपलोड केला जाणार आहे.

अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगणा रिचा अग्निहोत्री या दोघी बॅग पॅक करून फिरायला निघाल्या असून महाराष्ट्रातल्या गूढ, अगम्य जागा प्रेक्षकांना दाखवणार आहेत. या शोची संकल्पना आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातला तरुण आज नवनवीन ठिकाणांना भेटी देत असतो. पण आडवाटेवरचा महाराष्ट्र या वेबसिरीजमध्ये दाखवला जाणार आहे. भटकंती मालिका करत असतानाच हा गूढ, अगम्य आणि नैसर्गिक आश्चर्याने नटलेला महाराष्ट्र फिरायचा अशी कल्पना होती, असे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सांगितले. द फिल्म क्लिक आणि कनेक्ट फिल्म्स या संस्थांनी या वेब चॅनलची निर्मिती केली आहे.

मराठी मनोरंजन क्षेत्रात व्हल्गर, बोल्ड, शिवीगाळ अशा आशयाचा कंटेंट न देता, माणसाच्या जगण्यातल्या रोजच्या आयुष्यातल्या घडामोडींवर बेतलेल्या सिरीयस मालिका या चॅनल वर आपल्याला बघायला मिळणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा