Advertisement

कलर्स मराठीवरील 'घाडगे अॅण्ड सून' मालिकेनं गाठला शंभरीचा पल्ला!


कलर्स मराठीवरील 'घाडगे अॅण्ड सून' मालिकेनं गाठला शंभरीचा पल्ला!
SHARES

'घाडगे अॅण्ड सून' या कलर्स मराठीवरील मालिकेनं १०० भाग पूर्ण केले आहेत. सुरूवातीपासूनच उत्तम कथानक, कलाकारांचा सहज अभिनय यामुळे या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यातील माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारी भाग्यश्री लिमये हिची ही पहिलीच मालिका आहे. तिनं आपल्या सोज्वळ अभिनय आणि नाजूक बोलण्यानं मालिकेत वेगळं स्थान निर्माण केलं आहे.


टीमचं सेलिब्रेशन

या मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र येत १०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन केलं. सगळ्यांनी एकत्र येऊन केकही कापला. यावेळी कलाकारांचा आनंद त्यांच्या सेल्फीतून दिसत आहे. कलाकार आणि टेक्निकल टीमने मालिकेचं शीर्षक गीत गाऊन आपला आनंद साजरा केला.या मालिकेचं लेखन अश्विनी शेंडे आणि अरूणा जोगळेकर यांनी केलं आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर बरोबर सुकन्या कुलकर्णी, अतिषा नाईक, मंजुषा गोडसे, उदय सबनीस, स्वाती लिमये, भाग्यश्री लिमये अशी तगडी स्टारकास्ट आहे.हेही वाचा

'सारेगमप'ला मिळाली नवीन अॅँकर!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा