Advertisement

'सारेगमप'ला मिळाली नवीन अॅँकर!


'सारेगमप'ला मिळाली नवीन अॅँकर!
SHARES

'घे पंगा कर दंगा' म्हणत सुरू झालेली झी मराठीवरील सारेगमप ही मालिका हळूहळू रसिकांची मनं जिंकत आहे. तब्बल चार वर्षांनंतर 'सारेगमप'चं नवीन पर्व मोठ्या उत्साहात सुरू झालं आहे. सोमवारपासून प्रत्येक शहरातून निवडून आणलेल्या स्पर्धकांनी संगीताच्या मैदानात सुरेल पंगा घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र यावेळी सारेगमप या गाण्याच्या कार्यक्रमाला नवीन परीक्षक (जज) बरोबरच नवीन निवेदक (अॅँकर)ही मिळाली आहे.


रोहितला साथ देणार सानिया

या नवीन दमाच्या पर्वासाठी तरुणांचा लाडका लिटिल चॅम्प गायक-संगीतकार रोहीत राऊत यंदाच्या पर्वात निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, आता रोहितला साथ द्यायला एक नवीन दमाची गायिका सारेगमपला मिळाली आहे. आरजे सानिका ही आता रोहित बरोबर निवेदकाची बाजू सांभाळणार आहे. खरंतर सानिका एक स्पर्धक म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाली होती. मात्र, आता सानिका एक स्पर्धक म्हणून पुढे न जाता ती अँकर म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सानिका ही व्यावसायाने आरजे आहे.


सरप्राईझ जज

झी मराठीवरील सारेगमपचे परीक्षक हा नेहमीच औत्सुक्याचा विषय ठरला आहे. अनेक मान्यवरांनी सारेगमपच्या मंचावरून महाराष्ट्राच्या गानरत्नांना मार्गदर्शन केलं आहे. यंदाच्या युथफुल पर्वासाठीही जज ही अगदी तसेच आहेत. हिंदी-मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील प्रख्यात गीतकार-संगीतकार-लेखक-गायक राष्ट्रीय पुरस्कार विजेते स्वानंद किरकिरे हे या पर्वाचे तिसरे आणि महत्त्वाचे जज आहेत. स्वानंद किरकिरे यांच्या एंट्रीमुळे सारेगमपच्या या पर्वाची परीक्षकांची टीम परिपूर्ण झाली आहे. स्वानंद यांच्याबरोबरच दिग्दर्शक रवी जाधव आणि गायिका बेला शेंडे परीक्षकाच्या भूमिकेत आहेत.



हेही वाचा

गुरुनाथच्या अायुष्यात अाली दुसरी शनाया?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा