अनुष्का-रणवीरचे 'ब्रेकअप' गीत


SHARE

मुंबई - करण जोहरच्या बहुचर्चित ए दिल हे मुश्किल चित्रपटातील 'ब्रेकअप' हे गीत प्रसिद्ध झाले आहे. या गीतात ब्रेकअपचा उल्लेख असला तरी हे गाणे इतर गाण्यांपेक्षा हटके आहे. तसेच हे गीत भरपूर धमाल मस्तीने भरलेले आहे.

चित्रपट निर्मात्यांनी याआधी या गीताचे टीझर लाँच करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांना या गीताची उत्सुकता लागली होती. आता हे गीत प्रसिद्ध झाले आहे. या गीतात अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर ब्रेकअप सेलिब्रेट करताना दिसत आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत शब्दबध्द केले असून, अरिजीत सिंग, बादशाह, जोनिता गांधी आणि नकाश अजिज यांनी हे गीत गायले आहे. या गाण्यात ब्रेकअपला मजेदार पद्धतीने सेलिब्रेट करण्यात आले असून, हे गीत पुढच्या काळातील हिट पार्टी साँग ठरू शकते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या