'गोलमाल अगेन'चं चित्रीकरण 9 मार्चपासून


'गोलमाल अगेन'चं चित्रीकरण 9 मार्चपासून
SHARES

मुंबई - बहुचर्चित 'गोलमाल अगेन' चित्रपटाचं चित्रीकरण 9 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या तीन भागांचं दिग्दर्शन करणारे रोहित शेट्टीच चौथ्या भागाचं दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेता अजय देवगण राजस्थानमधील आपल्या 'बादशाहो' चित्रपटाचं चित्रीकरण संपवून मुंबईत परतणार आहे. या चित्रपटामध्ये तब्बू, परिणीती चोप्रा आणि प्रकाश राज यांनी नव्यानं एन्ट्री केली आहे. शेट्टी यांचं दिग्दर्शन असलेल्या 'सिंघम' चित्रपटामध्ये प्रकाश राज यांनी यापूर्वी खलनायकाची भूमिका साकारली होती. 'गोलमाल'मध्ये ते व्हिलनचीच भूमिका साकारणार आहेत. या नवीन कलाकारांव्यतिरिक्त अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू हे पूर्वीचे कलाकारही या चित्रपटात असतील.

संबंधित विषय