Advertisement

‘हलाल’ला फिल्मफेअरमध्ये आठ नामांकनं

अमोल कागणे फिल्म्सची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘हलाल’ने बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. राज्य पुरस्कारांसह इतर पुरस्कार सोहळ्यांमध्येही चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे.

‘हलाल’ला फिल्मफेअरमध्ये आठ नामांकनं
SHARES

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘हलाल’ चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा अशा विविध विभागांमध्ये एकूण आठ नामांकनं पटकावली आहेत. 



इतरही पुरस्कार 

अमोल कागणे फिल्म्सची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘हलाल’ने बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. राज्य पुरस्कारांसह इतर पुरस्कार सोहळ्यांमध्येही चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे. आता फिल्मफेअरसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्येही चित्रपटाला आठ नामांकनं मिळणं ही आनंददायी गोष्ट असल्याचं पाटील यांचं म्हणणं आहे.


सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी

शिवाजी लोटन पाटील यांना दिग्दर्शनासाठी क्रिटिक्स नामांकन, प्रियदर्शन जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी क्रिटिक्स नामांकन, प्रीतम कागणेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स नामांकन आणि पदार्पणासाठीही नामांकन मिळालं आहे. तसंच चिन्मय मांडलेकरला सहाय्यक अभिनेत्यासाठी, सईद अख्तर यांना ‘मौला मौला...’ या गाण्यासाठी, सुबोध पवार यांना सर्वोत्कृष्ट गीतासाठी, राजन खान यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी आणि निशांत ढापसे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी नामांकन मिळाली आहेत.


नामांकनं स्पेशल

फिल्मफेअर पुरस्कारांविषयी लहानपणापासून मनात कुतुहल आहे. या पूर्वी अनेकदा हा सोहळा टीव्हीवर पाहिला आहे. आता आपल्या चित्रपटासाठी फिल्मफेअरसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचं नामांकन मिळणं ही फारच आनंदाची गोष्ट आहे. आजवर चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी फिल्मफेअरची नामांकनं नक्कीच स्पेशल आहेत, अशी भावना निर्माता अमोल कागणे यांनी व्यक्त केली.



हेही वाचा -

स्टंट करताना दुखापत झाली, पण आत्मविश्वास वाढला - नुपूर दैठणकर

नागराज बनवणार ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'चा 'प्रोमो'!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा