हॅपी बर्थ डे सुश, झीनत

 Pali Hill
हॅपी बर्थ डे सुश, झीनत
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - सुष्मिता सेन आणि झीनत अमान या दोन अभिनेत्रींचा जन्मदिवस एकाच दिवशी येतो. त्यामुळे या दोन्ही अभिनेत्रींचं नात आणखी घट्ट झालंय. या दोघींच्या ग्लॅमरमध्येही बरचसं साम्य आहे. 19 नोव्हेंबरला या दोघींचाही वाढदिवस. सुष्मिताचा हा 38वा तर झीनत अमानचा 64 वा वाढदिवस आहे. आपल्या वेगळ्या स्टाइलसाठी ओळखली जाणारी सुष्मिता सेन आजही तेवढीच सुंदर दिसते. 70व्या दशकात जेव्हा बॉलिवुड अभिनेत्री साडी आणि पंजाबी ड्रेसमध्ये दिसायच्या, तेव्हा झीनत मात्र एक मॉर्डन अभिनेत्री म्हणून स्क्रीनवर झळकली होती. या दोघींतलं आणखी एक साम्य म्हणजे 1970मध्ये झीनत अमान यांना मिस एशिया पॅसिफिक अॅवॉर्ड मिळाला होता. तर 1994मध्ये सुष्मितालाही मिस युनिव्हर्सचा अॅवॉर्ड मिळाला होता.

Loading Comments