दिलीप कुमार @ 94

 Pali Hill
दिलीप कुमार @ 94
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - हिंदी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा रविवारी 11 डिसेंबरला 94 वा वाढदिवस आहे. उत्कृष्ट अभिनय करून त्यांनी पाच दशकापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. यंदा ते आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करू शकणार नाहीत. त्याचं कारण त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे नाही, तर त्यांच्या पत्नी सायरा बानोंच्या भावाचं निधन हे त्या पाठचं कारण आहे. त्यामुळे यंदा ते आपला वाढदिवस जवळच्या काही मित्रांसोबत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. ते राज्यसभेचे सदस्यही राहिले होते. दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

Loading Comments