कधी काळी राणा दा होता बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर

सर्वांचा लाडका राणा दा म्हणजेच खऱ्या आयुष्यातील हार्दिक जोशी मालिकेत येण्यापूर्वी काय करत होता हे खूप क्वचितच कुणाला माहित असावे. आज आम्ही त्याच्याबद्दलच काही गोष्टी सांगणार आहोत.

  • कधी काळी राणा दा होता बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर
  • कधी काळी राणा दा होता बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर
  • कधी काळी राणा दा होता बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर
SHARE

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका तर सर्वांनाच माहीत असेल. मालिका जरी माहीत नसली तरी मालिकेतील राणा दा आणि पाठक बाई या दोन कॅरेक्टरबद्दल तर ऐकूनच असाल. तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रेक्षकांच्या मनात उतरली. फक्त मालिकाच नाही तर मालिकेतील राणा दा आणि पाठक बाई तर प्रत्येकाच्या कुटुंबाचा जणू भागच बनले. मालिकेमधील 'चालंतय की' हा डायलॉग तर प्रेक्षकांनी उचलून धरला.

सर्वांचा लाडका राणा दा म्हणजेच खऱ्या आयुष्यातील हार्दिक जोशी मालिकेत येण्यापूर्वी काय करत होता हे खूप क्वचितच कुणाला माहित असावे. आज आम्ही त्याच्याबद्दलच काही गोष्टी सांगणार आहोत.


बॅकग्राऊंड डान्सरपासून सुरुवात

५ फूट ११ इंच उंच, पिळदार शरीरयष्टी, हँडसम हंक असी ओळख असलेला हार्दिक जोशी आता संपूर्ण महाराष्ट्रात राणा दा म्हणूनच लोकप्रिय आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. मालिकेत येण्यापूर्वी हार्दिक जोशीनं खूप संघर्ष केलेला आहे. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि तो एक उत्कृष्ठ डान्सर सुद्धा आहे. त्यानं बॉलिवूडमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं आहे. अभिनेता अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या गाण्यात हार्दिक जोशीनं साईड डान्सर म्हणून काम केलं आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या हाताखाली डान्सचं प्रशिक्षण घेतलं आहे.


छोट्या पडद्यावर एन्ट्री

अनेक सीरिअल्स आणि चित्रपटांसाठी ऑडिशन्सही दिले. त्याला क्राईम पेट्रोलच्या एका एपिसोडमध्ये भूमिका मिळाली होती. परंतु त्यानंतर हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये त्यानं छोट्या मोठ्या भूमिका केलेल्या आहेत.


बाईक्सची क्रेझ

अभिनयाव्यतिरिक्त त्याला ढोलताशा पथकाचं फार वेड आहे. तो ‘मौर्य ढोलताशा पथका’चा सदस्य सुद्धा आहे. त्याचं ढोलताशामधील वाद्य पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करतात. त्याला मोटारबाईक्सची आवड असून तो स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त आहे.हेही वाचा

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता सर्वांना 'घाबरवणार'

उपेंद्र लिमये साकारणार वकिलाची भूमिका


संबंधित विषय
ताज्या बातम्या