चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता सर्वांना 'घाबरवणार'

जीसिम्स’ स्टुडिओचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेल्या चित्रपटात तो झळकणार आहे. 'बळी’ असं या चित्रपटाचं नाव असून या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

  • चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता सर्वांना 'घाबरवणार'
SHARE

आतापर्यंत तुम्ही स्वप्नील जोशीला रोमँटिक चित्रपटात भूमिका साकारताना पाहिलं असेल. पण पहिल्यांदाच तुम्हाला तुमचा आवडता चॉकलेट बॉय हॉरर चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘जीसिम्स’ स्टुडिओचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेल्या चित्रपटात तो झळकणार आहे. 'बळी’ असं या चित्रपटाचं नाव असून या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

View this post on Instagram

अर्जुन सिंग बरान व कार्तिक निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ची निर्मिती असलेला व स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला विशाल फुरीया दिग्दर्शित 'बळी- दि विक्टम' या मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित ‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांची निर्मिती असलेला आणि स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला एक वेगळा विषय मांडणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बळी- दि विक्टम' असे या चित्रपटाचे नाव असून या सिनेमाचे नुकतेच पहिले पोस्टर समाज माध्यमांवर अर्थात सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. 'बळी- दि विक्टम' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे त्यातून प्रतीत होते. सिनेमा २०२० साली प्रदर्शित होणार असल्याचंही पोस्टर ध्वनित करते. हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे. चित्रपटाचा नायक स्वप्नील जोशी म्हणाला, “यंदाच्या वर्षी प्रगल्भ मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांच्या नवनवीन प्रकारांना पाठबळ दिले आणि आपलेसे केले. त्यातील माझे एक छोटे योगदान म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून मी हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद मला आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील माझी आवडती माणसे आहेत. आमची ही टीम प्रेक्षकांना चांगलीच ‘घाबरवून’ सोडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.” या सिनेमाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी याआधी मराठी ‘लपाछपी’चे दिग्दर्शन केले होते. तो त्यांचा पहिला चित्रपट होता आणि तो विशेष गाजला होता. त्याचबरोबर 'क्रिमिनल जस्टीस' या गाजलेल्या वेबसिरीजचे दिग्दर्शनदेखील विशाल फुरीया यांनी त्रिंगमांशू धुलिया यांच्याबरोबर केले होते. “मराठी प्रेक्षकांना ‘लपाछपी’ खूप आवडला होता. प्रेक्षकांना हॉरर चित्रपटही आवडतात आणि ते त्यांना चांगला प्रतिसाद देतात हे या चित्रपटाने सिद्ध केले होते. म्हणून मला मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट करायचे आहेत. स्वप्निलसारखा प्रेक्षकांच्या गळयातील ताईत असलेला अभिनेता आणि अर्जुन व कार्तिकसारखे या क्षेत्रातील दिग्गज निर्माते यांचे माझ्या चित्रपटाला पाठबळ आहे. या जोरावर मी ‘लपाछपी’पेक्षा अधिक मोठा आणि अधिक घाबरवणारा

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on


'बळी' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असं त्यातून प्रतीत होतं. सिनेमा २०२० साली प्रदर्शित होणार असल्याचंही पोस्टरमधून कळून येतं. हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल? आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार आहे? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तर चित्रपट पाहिल्यानंतर कळतील. त्यामुळे प्रेक्षकांना २०२० पर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.


स्वप्नील म्हणाला की, मी हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. हा चित्रपट मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील माझी आवडती माणसं आहेत. आमची ही टीम प्रेक्षकांना चांगलीच ‘घाबरवून’ सोडेल, याची मला पूर्ण खात्री आहे.” आता स्वप्नील जोशी प्रेक्षकांना घाबरवण्यास किती यशस्वी होतोय हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेल.हेही वाचा

उपेंद्र लिमये साकारणार वकिलाची भूमिका

क्रिती सेननचा 'पानिपत'मधील फर्स्ट लूक पाहिला का?

संबंधित विषय
ताज्या बातम्या