उपेंद्र लिमये साकारणार वकिलाची भूमिका

अभिनेते उपेंद्र लिमये आगामी ‘आक्रंदन’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात ते सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

SHARE

आपल्या दमदार अभिनयानं वेगवेगळ्या भूमिका सक्षमपणे साकारणारे अभिनेते उपेंद्र लिमये आगामी ‘आक्रंदन’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात ते सरकारी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाची कथा अशी आहे की, एका कुटुंबावर काही जणांकडून अमानुष अत्याचार केले जातात. त्यांची केस लढण्यास कुणीही तयार नसते. या पीडित कुटुंबाच्या वकिलाची भूमिका साकारताना उपेंद्र लिमये दिसणार आहेत. गोविंद मोतीराम आहेर निर्मित, शशिकांत देशपांडे लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट आहे. ‘वंदे मातरम फिल्मस’ चे विवेक पंडित या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून 'पार्वती पुत्र प्रॉडक्शन्स'च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

'आक्रंदन या चित्रपटात उपेंद्र लिमये यांच्यासोबत शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार, विक्रम गोखले, गणेश यादव, बाळ धुरी, तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या भूमिका आहेत.हेही वाचा

'पती, पत्नी और वो' चित्रपटाचा मजेदार ट्रेलर प्रदर्शित

किर्ती सेननचा 'पानिपत'मधील फर्स्ट लूक पाहिला का?
संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ