दाऊदची बहिण श्रद्धा कपूर !

 Mumbai
दाऊदची बहिण श्रद्धा कपूर !

मुंबई - कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरवर आधारलेला 'हसीना-द क्वीन ऑफ मुंबई' हा चित्रपट येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हसीनाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'हसीना द क्वीन ऑफ मुंबई' या चित्रपटाचं पोस्टरही नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं.

आजवर गुन्हेगारी जगतावर आधारलेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दाऊदचे दर्शन घडले होते. मात्र दाऊदच्या बहिणीवर पहिल्यांदाच चित्रपट बनतोय. नाहिद खानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे अपूर्व लाखीया. या चित्रपटाद्वारे श्रद्धा कपूर ही पहिल्यांदाच स्त्रीकेंद्रीत चित्रपटामधील मुख्य भूमिका साकारीत आहे. या चित्रपटात दाऊद इब्राहिमची भूमिका श्रद्धाचा भाऊ सिद्धनाथ कपूर साकारीत असून अभिनेता शर्मन जोशी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पहायला मिळेल. हा चित्रपट येत्या 14 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Loading Comments