Advertisement

कलर्सवर रंगणार होळी स्पेशल एपिसोड्स!


कलर्सवर रंगणार होळी स्पेशल एपिसोड्स!
SHARES

कलर्स मराठीवरील 'तुमच्यासाठी काय पन' या मालिकेत दर आठवड्यात प्रेक्षकांना काहीना काहीतरी वेगळं बघायला मिळतं. आता होळी आणि रंगपंचमीनिमित्ताने प्रेक्षकांना येत्या आठवड्यात 'रंग महाराष्ट्राचा' ही होळी स्पेशल संकल्पना बघायला मिळणार आहे.



प्रेक्षकांसाठी स्पेशल काय?

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या कलाकारांचा कलाविष्कार या भागात बघायला मिळणार आहे. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होळी आणि रंगपंचमी कशी साजरी केली जाते? हे देखील बघायला मिळणार आहे. तसेच 'आज काय स्पेशल' या कार्यक्रमात देखील होळी आणि रंगपंचमीचा विशेष भाग रंगणार आहे.


विनोदवीरांची धमाल मस्ती

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होळी कशी धुमधडाक्यात साजरी होते हे 'तुमच्यासाठी काय पन'च्या भागात बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमामधील विनोदवीरांनी गवळण, चाळीतली रंगपंचमीची धम्माल मस्ती, सादर केली आहे. यामधील लक्ष वेधून घेणारा आणि सगळ्यात वेगळा प्रकार म्हणजे 'लोककला'. लोककलेमध्ये भारुड, गवळण असे वेगवेगळे प्रकार सादर होतात. यावेळी या विनोदवीरांनी भजन, भारुड स्कीटच्या रुपात सादर केली.


पाहुण्यांनी कोणते स्पेशल पदार्थ बनवले

'आज काय स्पेशल' या कार्यक्रमामध्ये अगदीच पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली गेली. या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांनी होळी निमित्ताने पुरणाची पोळी, वाटाणा पोहा करंजी, नारळाची पोळी असे पदार्थ बनवले. तेव्हा 'तुमच्यासाठी काय पन'चा 'रंग महाराष्ट्राचा' हा होळी विशेष भाग बघायला विसरू नका.



हेही वाचा

स्वप्नील जोशीचं छोट्या पडद्यावर पुन्हा कमबॅक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा