Advertisement

हिमेशने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ!


हिमेशने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ!
SHARES

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा माहोल आहे. सोनम कपूर, नेहा धुपियानंतर आता गायक हिमेश रेशमियाने देखील लग्न केलं आहे. हिमेशने आपली गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत लग्न केलं आहे. सोनिया ही एक टीव्ही अभिनेत्री आहे. या आधी या दोघांनी अनेकवेळा एकत्र पाहण्यात आलं होतं.

सोनिया आणि हिमेशने कोर्ट मॅरेज केलं आहे. दोन दिवस आधीच हिमेश आणि सोनियाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. ज्यात कुटूंबीय आणि जवळचा मित्र परिवार सहभागी झाला होता.



हिमेशचं हे दुसरं लग्न आहे. या आधी कोमलसोबत हिमेशचं लग्न झालं होतं. मात्र तब्बल २२ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांना स्वयम नावाचा मुलगा आहे. कोमलशी घटस्फोट घेतल्यानंतर हिमेश सोनियाबरोबर लिव्ह इनमध्ये रहात होता. अखेर या दोघांनी लग्नबंधनात अडकायचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी हिमेशने सारेगमपा या रिअॅलिटी शो साठी परीक्षक म्हणून काम बघितलं. २००३ मध्ये तेरे नाम या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे हिमेश सगळ्यांचा आवडता झाला.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा