सावधान इंडिया बंद होणार


SHARE

स्टार भारतवरील 'सावधान इंडिया' हा तुमचा आवडता कार्यक्रम लवकरच बंद होणार आहे. सध्या छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमाला चांगला टीआरपी मिळत आहे. आतापर्यंत सावधान इंडिया बंद होणार अशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार स्टार भारत या चॅनलने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना शुटींग थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हा कार्यक्रम वेगवेगळे आठ प्रोडक्शन हाऊस तयार करतात. अचानक चॅनलकडून आलेल्या या फतव्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.


सेलिब्रिटिजनी होस्ट केला कार्यक्रम

सध्या सावधान इंडिया हा कार्यक्रम सुशांत सिंह होस्ट करतो. सुशांतच्या आधी मोहनीश बहल, सिद्धर्थ शुक्ला, हितेन तेजवानी, पूजा गौर, शिवानी तोमर आणि दिव्या दत्त या सेलेब्रेटींनी सावधान इंडिया होस्ट केला आहे. हा कार्यक्रम आधी लाईफ ओके या चॅनेलवर प्रसारीत केला जायचा. त्यानंतर आता हे चॅनल स्टार भारतच्या नावाने सुरू करण्यात आले. या चॅनेलवर हा एवमेव कार्यक्रम दीर्घकाळ प्रसारित केला गेला आहे.


प्रेक्षकांच्या कार्यक्रमाबद्दल तक्रारी

सूत्रांच्या माहितीनुसार अनेक प्रेक्षकांच्या कार्यक्रमाबद्दल आलेल्या तक्रारींवरून हा कार्यक्रम बंद करण्यात येत आहे. खऱ्या घटनांवर आधारीत हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात नाट्यरूपांतर करून या घटना प्रेक्षकांसमोर मांडल्या जातात. त्यावेळी वापरण्यात येणारी पद्धतही चुकीची असल्याच्या तक्रारी चॅनेलकडे प्रेक्षकांनी केल्या. त्यामुळे टीआरपी चांगला असूनदेखील ही मालिका बंद करण्यात येणार आहे.हेही वाचा

कसं असेल मराठी बिग बॉस? इथे पाहा फर्स्ट लूक!


संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ