सिद्धार्थ बरोबर हृतिक ही थिरकला 'पिंगा' गाण्यावर

  Mumbai
  सिद्धार्थ बरोबर हृतिक ही थिरकला 'पिंगा' गाण्यावर
  मुंबई  -  

  स्टार प्लस वाहिनीवरील 'नच बलिये ' या रियालिटी शो मध्ये मराठमोळी जोडी सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती सहभाग घेणार आहेत, हे समजल्यापासून सिद्धार्थ चे फॅन्स खुश झाले होते.पण प्रत्यक्षात सिद्धार्थ आणि तृप्ती ने चक्क हृतिक रोशनलाच आपल्या तालावर नाचवलय.  

  नच  बलियेच्या शो मध्ये सिद्धार्थ आणि तृप्तीने पिंगा ह्या गाण्यावर नाच केला. तो नाच इतका सुंदर झाला की, त्यांनी उपस्थितांना तर थिरकायला लावलचं.. पण हृतिक रोशनही स्वतःला नाच करण्यापासून आवरू शकला नाही. महत्वाचे म्हणजे हा नाच करताना सिध्दार्थने बाईचा पोशाख म्हणजेच साडी नेसली होती. ह्यावेळी सिद्धार्थ आणि तृप्तीने हृतिकला पिंगा गाण्याच्या स्टेप्सही शिकवल्या.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.