हम साथ साथ (नही) है...

 Pali Hill
हम साथ साथ (नही) है...

मुंबई - नोटबंदीच्या निर्णयावर अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी नोटबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय. तर समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया यांनी नोटबंदीला विरोध केलाय. जया बच्चन ममता बॅनर्जींच्या धरणं आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांच्यासोबत गेल्या होत्या. तर अमिताभ बच्चन यांनी 2 हजारांच्या नव्या नोटेची तुलना नुकत्याच झळकलेल्या त्यांच्या पिंक चित्रपटाशी केली होती. ऐश्वर्या बच्चन यांनी नोटबंदीच्या निर्णयाचं एक धाडसी पाऊल म्हणून कौतुक केलं होतं.

Loading Comments