Advertisement

मेरे पास माँ है...

मेरे पास पैसा है, बंगला है, गाडी है, नौकर है, बँक बॅलन्स है, अौर तुम्हारे पास क्या है.... मेरे पास माँ है, दीवार चित्रपटातला शशी कपूर यांचा हा सर्वोत्तम डायलाॅग अाजही सर्वांच्या मनावर राज्य करत अाहे.

मेरे पास माँ है...
SHARES

"मेरे पास पैसा है, बंगला है, गाडी है, नौकर-चाकर है, बँक बॅलन्स है, अौर तुम्हारे पास क्या है?.... मेरे पास माँ है", दीवार चित्रपटातला शशी कपूर यांचा हा अजरामर डायलाॅग अाजही सर्वांच्या मनावर राज्य करत अाहे. जवळपास 116 चित्रपटांत भूमिका साकारणाऱ्या शशी कपूर यांनी अापल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. शशी कपूर यांचे हे काही फेमस डायलाॅग्स...मेरे पास माँ है...

चित्रपट - दीवार

मुंबईतील कुख्यात गुंड विजय वर्माला (अमिताभ) सब-इन्स्पेक्टर रवी शर्मा (शमी कपूर) शरण येण्यासाठी सांगतो, तेव्हा 'अापल्याकडे गाडी, बंगला, नोकर, बँक बॅलन्स अाहे, तुझ्याकडे काय अाहे?' असं विचारतो. तेव्हा 'माझ्याकडे अाई अाहे', असं सांगणारा शशी कपूर यांचा डायलाॅग सर्वांच्या अाजही तोंडावर अाहे!ये प्रेम रोग है, शुरू में दुख देता है... बाद में बहुत दुख देता है...

चित्रपट - नमक हलाल

राजा कुमार (शशी कपूर) हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या डान्सर निशाच्या (परवीन बाबी) प्रेमात पडतो. पण निशाला राजाला मारण्याची सुपारी मिळालेली असते. निशाही राजाच्या प्रेमात पडते. पण राजाला ही गोष्ट कळते, तेव्हा शशी कपूर परवीन बाबीला उद्देशून हा डायलॉग मारतात. इस दुनिया में अादमी इन्सान बन जाएं... तो बहुत बडी बात है

चित्रपट - कभी कभी

काॅलेजमध्ये कविता सादर करताना अमित मल्होत्राचे अापलीच सहकारी पूजावर (राखी) प्रेम जडते. पण पूजाचे वडील तिचे लग्न विजय खन्नाशी (शशी कपूर) लावून देतात. एकूणच नात्यांची गुंतागुंत असणाऱ्या या चित्रपटात शशी कपूर यांचा हा डायलाॅग सर्वांची वाहवा मिळवतो.अपना तो एक ही उसूल है... जियो तो अपने लिए, सोचों तो दुसरों के लिए

चित्रपट - एक अौर एक ग्यारह

एक अौर एक ग्यारह या काॅमेडी चित्रपटात वकिलाची भूमिका साकारताना शशी कपूर आयुष्याचे वेगवेगळे कंगोरे सर्वांसमोर अाणत असतो. मात्र, स्वत:साठी जगताना दुसऱ्यांसाठी विचार करणे, हे अापल्या जीवनाचे तत्व अाहे, असं सांगून शशी कपूर सर्वांची दाद मिळवतात. मत सोचो की देश तुमको क्या देता है...सोचो ये की तुम देश को क्या दे सकते हो

चित्रपट - रोटी कपडा अौर मकान

श्रीमंत व्यावसायिक मोहन बाबू (शशी कपूर) अापली सेक्रेटरी शीतलच्या (झीनत अमान) प्रेमात अाकंठ बुडून जातो. पण शीतलचे प्रेम हे फक्त मोहनच्या श्रीमंतीवर असते. तेव्हा शशी कपूर तिला हा संवाद एेकवून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा