'इन द सर्च ऑफ' ठरले उंबरठाचे मानकरी

 Dadar
'इन द सर्च ऑफ' ठरले उंबरठाचे मानकरी
Dadar , Mumbai  -  

प्रभादेवी - 14 व्या उंबरठा या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीची सांगता शनिवारी रात्री झाली. या वेळी अनुभुती संस्थेच्या इन द सर्च ऑफ ही एकांकिका अव्वल ठरली. तर झिरो बजेट प्रोडक्शनची ओवी या एकांकिकेला दुसरे, औरंगाबाद येथील नाट्यवाडा या एकांकिकेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याच बरोबर एकूण सात एकांकिका अंतिममध्ये दाखल झाल्या होत्या. प्राथमिक मधील 45 एकांकिकांमधून या सात एकांकिकांची निवड झाली होती. तसंच पुणे, औरंगाबाद, रत्नागिरी, मुंबई, ठाणे या विविध ठिकाणांवरुन येथे नाट्यसंस्था आल्या होत्या. ही अंतीम फेरी रविंद्र नाट्य मंदिर येथे 17 डिसेंबर रोजी रंगली.

Loading Comments