Advertisement

ओशोंच्या भूमिकेत दिसणार आमिर खान; आलियासुद्धा जोडीला!

हॅालिवूड असो वा बॅालिवूड... लहान-मोठ्या सर्वच कलाकारांना आज वेब सिरीजने वेड लावलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज यशस्वी ठरल्यानंतर वेब सिरीजने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. यात आमिर खान आणि आलिया भट्ट हे हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकारही मागे नाहीत.

ओशोंच्या भूमिकेत दिसणार आमिर खान; आलियासुद्धा जोडीला!
SHARES

बॅालिवुडमध्ये मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिर खानने काही दिवसांपूर्वीच भगवान श्रीकृष्णांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यापूर्वी तो ओशोंच्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या आगामी वेब सिरीजमध्ये आमिर ओशोंच्या भूमिकेत दिसणार असून, सोबत आलिया भट्टसुद्धा असण्याची शक्यता आहे.


ओशो यांच्यावर वेब सिरीज

हॅालिवूड असो वा बॅालिवूड... लहान-मोठ्या सर्वच कलाकारांना आज वेब सिरीजने वेड लावलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज यशस्वी ठरल्यानंतर वेब सिरीजने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. यात आमिर खान आणि आलिया भट्ट हे हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकारही मागे नाहीत. ‘कपूर अँड सन्स’ फेम दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी रजनीश भगवान ‘ओशो’ यांच्यावर आधारित वेब सिरीजची योजना आखली आहे.


आमिरला स्क्रीप्ट आवडली

विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बत्रांच्या या वेब सिरीजमध्ये ओशोंच्या भूमिकेत आमिर दिसेल. तर माँ आनंद शीला यांची भूमिका आलिया साकारणार आहे. आमिरसारख्या संवेदनशील अभिनेत्याने शीर्षक भूमिकेचं आव्हान स्वीकारल्याने या वेब सिरीजबाबतची उत्सुकता वाढली आहे. कारण आमिर जे काही करतो ते खूप विचारपूर्वक करतो. आमिरला स्क्रीप्ट आवडली असून, लाॅस एंजेलिस आणि यूएसएसारख्या ठिकाणी भेटीगाठीही घेण्यात आल्याचं समजतं.


प्रथमच एकत्र

‘महाभारत’च्या अगोदर ही वेब सिरीज येणार आहे. ओशो बनण्यासाठी आमिरने होकार दिल्याची माहिती मिळाली आहे. आलियाही या वेब सिरीजची स्क्रीप्ट आवडली असली तरी ती या प्रोजेक्टमध्ये सहभागी असेल की नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. सर्व गोष्टी नीट जुळून आल्या तर या वेब सिरीजच्या निमित्ताने आमिर आणि आलिया प्रथमच एकत्र दिसतील. आमिर सध्या ‘ठग्ज आॅफ हिंदोस्तान’या आगामी महत्त्वाकांक्षी सिनेमाच्या कामात बिझी असून, आलियासुद्धा रणबीर कपूरसोबत आयान मुखर्जींच्या ‘ब्रम्हास्त्र’मध्ये व्यग्र आहे.



हेही वाचा -

दिग्दर्शिका कल्पना लाज्मी यांचं निधन

मराठमोळ्या मृण्मयीचं ‘एंड-काऊंटर’ करत बॉलिवूडमध्ये पदार्पण



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा