सागरिकाने काढली झहीरची विकेट!

 Mumbai
सागरिकाने काढली झहीरची विकेट!
Mumbai  -  

आपल्या भेदक गोलंदाजीने भल्याभल्यांना बोल्ड करणारा भारतीय टीमचा माजी क्रिकेटर झहीर खान स्वत: क्लीन बोल्ड झाला आहे. झहीर खानचा नुकताच साखरपुडा झाला आहे. झहीरचा साखरपुडा 'चक दे इंडिया' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सागरिका घाटगेसोबत झाला आहे. झहीरच्या साखरपुडाची बातमी झहीर खानने त्याच्या ट्विटरवरून दिली. ट्विटरवर दोघांनी अंगठी घातलेला फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.

'तुमच्या पत्नीच्या पसंतीवर कधीही हसू नका, तुम्हीही तिच्या निवडीपैकी एक आहात. पार्टनर फॉर लाईफ, एन्गेज्ड सागरिका घाटगे,' असे सांगून साखरपुड्याची बातमी टि्वट करून गुड न्यूज दिली. तर सागरिकानेही आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. त्याला सागरिकाने 'पार्टनर फॉर लाइफ' असे कॅप्शन दिले आहे. ही गुड न्यूज देताच दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

झहीर आणि सागरिका डेट करत असल्याचे युवराज सिंहच्या लग्नाच्या वेळी समोर आले. या लग्नात दोघे जोडीने एकत्र आले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी ते एकत्र दिसले होते.

'चक दे इंडिया' हा सागरिका घाटगेचा पहिला सिनेमा होता. 'चक दे इंडिया' या सिनेमात देखील सागरिकाने क्रिकेटरच्या प्रेयसीची भूमिका केली होती. पण, आता ख-या आयुष्यात देखील सागरिका झहीर खानची प्रेयसी असून लवकरच ते दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. तसेच सागरिकाने हिंदी आणि मराठी सिनेमात देखील काम केले आहे. तिचा 'प्रेमाची गोष्ट' हा मराठी सिनेमा चांगला गाजला होता.

Loading Comments