कपिल शर्माच्या शो ला प्रेक्षकांची वाढती नापसंती

 Mumbai
कपिल शर्माच्या शो ला प्रेक्षकांची वाढती नापसंती
कपिल शर्माच्या शो ला प्रेक्षकांची वाढती नापसंती
See all

मुंबई - कपिल शर्माचा 'कॉमेडी नाईट विथ कपिल' हा शो गेल्या काही महिन्यांपासून भारी चर्चेत होता. बरेच कॉमेडी शो आले पण कॉमेडी नाईट विथ कपिल शो समोर टीकू शकले नाही. पण, आता कपिलच्या शोला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. सहकलाकार सुनील ग्रोव्हर याच्याशी ऑस्ट्रेलियाहून येत असताना कपिलंच काही कारणामुळे फ्लाईटमध्येच भांडण झालं. त्यानंतर प्रेक्षकांची नाराजी वाढू लागली आणि आता तर त्याच्या शो ची पसंतीही कमी होताना दिसत आहे.

कपिलने काही दिवसांपूर्वी त्याचा लेटेस्ट एपिसोड युट्यूबवर अपलोड केलाय. ज्याला जवळपास 2 लाख लोकांनी बघितलंय. 5 हजार लोकांनी लाईक केलंय आणि तब्बल 14 हजार लोकांनी नापसंत केलंय. कपिलच्या शो ची वाढती नापसंती लोकांच्या मनात असलेली नाराजीच व्यक्त करतेय. त्यामुळे आता कपिलच्या शो लागलेली उतरती कळा कोण सावरणार हे येणारा काळच ठरवले.

(बातमीत दाखवलेले यूट्यूबवरचे आकडे हे बातमी करेपर्यंतचे आहेत, वर्तमानात या आकड्यात बदल होऊ शकतो.)

Loading Comments