कंगना कुठल्या 'विंटेज'कारमधून फिरणार?

 Mumbai
कंगना कुठल्या 'विंटेज'कारमधून फिरणार?

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या आगामी सिनेमा ‘रंगून’साठी अँटिक आणि महागड्या विंटेज कारमधून फिरताना दिसणार आहे. पण अद्याप ती कोणती कार घेणार हे मात्र ठरलेलं नाही. त्यामुळे कंगणाच्या या नव्या कारबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

या सिनेमाची कहाणी दुसऱ्या महायुद्धावर आधारित आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री कंगना महिनाभर दैनंदिन वापरासाठी याच कारमधून फिरताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंमेंटच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला आणि वायाकॉम-18 मोशन पिक्चर्सने केली आहे. तर विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

1940च्या दशकात भारतात असलेल्या ब्रिटीशांचा प्रभाव या सिनेमात दाखवला जाणार आहे. जांबाज जुलिया हे 1940 च्या दशकातील एक व्यक्तमत्व होतं. तीच भूमिका निभावण्यासाठी सध्या कंगना सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. या सिनेमात सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना रणौत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

Loading Comments