• चिरतरुण जॅकीचा बॉलिवूड स्टाइल योगा
SHARE

जुहू - हॉलीवूड स्टार जॅकी चॅन हा त्याच्या 'कुंग फू योगा' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आला होता. या वेळी तो जुहूच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबला होता. या वेळी त्याने प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. त्याच्यासोबत अभिनेता सोनू सुद आणि चित्रपटातील इतर सहकारी देखील उपस्थित होता. स्टँडले वाँग दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सोनू सुद, दिशा पटनी आणि अमेयरा दस्तूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जॅकी चॅनची लहानपणापासूनची चाहती असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टीही त्याला भेटण्यासाठी आली होती. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान झालेले अनेक गमतीदार किस्सेही त्याने या वेळी प्रसारमाध्यमांसमोर मांडले. जॅकी चॅन 62 वर्षांचा असला तरी कामाप्रती त्याचा उत्साह आजही कायम आहे. 'कुंग फू योगा' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून 3 फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात झळकणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या